सर्व साधकांचे सर्वस्व असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘श्री गुरूंचे रूप पहाण्यासाठी मन आतुरलेले असते. त्यांना पाहिल्यावर मनाची स्थिती एकदम पालटून जाते. केवळ दर्शनमात्रे कृपावर्षाव करणार्या श्री साईंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
देवा (टीप), तूच असशी माय-बाप, धनी ।
कुणी नसे माझे या जीवनी ॥ १ ॥
तुझे मनोहर रूप पहाता लोचनी ।
भाव उचंबळून येई माझिया मनी ॥ २ ॥
वत्सल बोल तुझे पडता मज कानी ।
शंका सार्या क्षणात जाती विरूनी ॥ ३ ॥
कृपाळू दृष्टीने पहाता जेव्हा मजकडे ।
तुजवीन मज आता काही नको वाटे ॥ ४ ॥
प्रफुल्लित मन होई नमन करता तव चरणी ।
आनंदे गाईन गुरुकृपेची मधुर गाणी ॥ ५ ॥
तुझिया चरणी मिळे जो निवारा ।
अन्य कुठे न मिळे असा आसरा’ ॥ ६ ॥
टीप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |