दगडूशेठ ट्रस्‍टने ब्राह्मणभोजन घातल्‍याने आव्‍हाडांना पोटशूळ !

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड

मुंबई – दगडूशेठ ट्रस्‍टने १ सहस्र ब्राह्मणभोजन घातल्‍याने राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी, ‘गणपतीचे दर्शन सगळेच जात समूह घेत असतात. नवीन आदर्श घाला, क्षत्रिय, वैश्‍य, क्षुद्र यांनाही भोजन द्या. ५००० वर्षां पूर्वीच्‍या परंपरा मोडीत काढल्‍या पाहिजेत. कसबा निवडणूक हरल्‍यामुळे हे ब्राह्मण भोजन सुचले नाही ना ?’, असे टीकात्‍मक लिखाण ‘एक्‍स’ या सामाजिक माध्‍यमातून केले आहे.

संपादकीय भूमिका 

प्रत्‍येक गोष्‍टीला जातीयतेच्‍या चष्‍म्‍यातून पहाणारे जातीयवादी आव्‍हाड ! अनेक मंदिरांकडून दिल्‍या जाणार्‍या सुविधांचा लाभ मुसलमान मोठ्या प्रमाणात घेतात, त्‍यावर आव्‍हाड काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्‍या !