निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २३७
‘मोड आलेली कडधान्ये नियमितपणे खाल्ल्याने शरिराला आवश्यक ती जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात मिळतात’, असा प्रचार केला जातो. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाण जरी जास्त असले, तरी मोड आलेली कडधान्ये पचायला जड असतात. त्यांचे नियमित सेवन केल्याने शरिरातील अग्नी (पचनशक्ती) मंद होतो. ‘मोड आलेली कडधान्ये नियमितपणे खाणे डोळ्यांना मारक आहे’, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये नियमितपणे सेवन करणे टाळायला हवे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.९.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan