मुंबईतील संवेदनशील भागात अज्ञात चारचाकी घुसल्याचे प्रकरण

मुंबई – येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या संवेदनशील यलो गेटमध्ये रात्री २ वाजता घुसलेल्या अज्ञात चारचाकीचा शोध मुंबई पोलिसांनी लावला आहे. सीसीटीव्ही चित्रण आणि तांत्रिक साहाय्य यांच्या आधारे पोलिसांनी या चारचाकीतील तिघांना कह्यात घेऊन अटक केली आहे. २० जिवंत काडतुसे असलेले मॅगझिनही हस्तगत केले आहे. गौरेश मोहित वगळ, श्रेयस किरण चुरो आणि अभिषेक अजित माणगांवकर अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.
यलो गेटमध्ये शनिवारी रात्री दोनच्या सुमारास चारचाकी घुसली होती. तेथे तैनात असलेल्या सी.आय.एस्.एफ्.चे जवान दुर्गा हरिराम जैस्वाल यांनी चारचाकीचा पाठलाग केला. या वेळी त्यांची सर्व्हिस रायफल चारचाकीच्या मागील दारावर आदळून रायफलचे मॅगझिन आणि २० जिवंत काडतुसे पडली.
४ वर्षांनंतरही चौकशी अहवाल उघड न केल्यावरून अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार !
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जून या दिवशी !
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद