कथित शव पिशव्यांचे प्रकरण

मुंबई – कथित शव पिशव्या (बॉडी बॅग) प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा नोंद केला आहे. सौ. किशोरी पेडणेकर यांच्यासह माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त, माजी महापालिका उपायुक्त, खासगी कंत्राटदार वेदान्ता इनोटेक आणि अनोळखी सरकारी अधिकार्याच्या विरोधात आर्थिक अपहार अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ४९ कोटी ६३ लाख रुपयांच्या या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याआधी सौ. पेडणेकर यांच्यासह अन्य काही जणांवर गुन्हा नोंद केला होता. यातील महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांना अटक करून त्यांचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणी भाजपचे आमदार किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती.
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली
सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा होणार
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !