‘सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील स्वागतकक्षात श्रीकृष्णाचे चित्र आहे. ४.७.२०२३ या दिवशी श्रीकृष्णाच्या चित्रातील सुदर्शनचक्रावरील हाराच्या भागातीलच फुले गळून पडली आहेत आणि बाकी हार आहे तसाच आहे. फुले आपोआप गळून खाली पडण्यामागील कार्यकारणभाव येथे दिला आहे.
१. ४.७.२०२३ या दिवशी ६ व्या आणि ७ व्या पाताळातील असुरांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात रहाणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सद़्गुरु, संत आणि साधक यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमण करणे : सनातनच्या रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षात असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये ३० टक्के कृष्णतत्त्व कार्यरत झाले आहे. त्यामुळे हे चित्र पाहिल्यावर ते सजीव आणि जागृत असल्याचे जाणवते. त्यामुळे ४.७.२०२३ या दिवशी दुपारी ४ वाजता जेव्हा रामनाथी आश्रमावर ६ व्या आणि ७ व्या पाताळातील असुरांनी सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सद़्गुरु, संत आणि साधक यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमण केले, तेव्हा त्यांचे तसेच आश्रमातील साधक, संत आणि सद़्गुरु यांचे रक्षण होण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील लक्ष्मीतत्त्व आणि सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यातील गणेशतत्त्व जागृत होऊन कार्यरत झाले. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हातातून त्रिशूळ आणि सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्या हातातून अंकुश असुरांच्या दिशेने गेले अन् त्यांतील ४० टक्के असुरांचा नाश झाला. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सद़्गुरु आणि संत यांच्यावरील असुरांचा सूक्ष्मातील आक्रमण नष्ट झाले.
२. असुरांनी त्यांच्या आक्रमणाची दिशा पालटून सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना लक्ष्य केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देहातून श्रीकृष्णमय चैतन्याचा झोत रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षात असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये कार्यरत होणे : त्यानंतर असुरांनी त्यांच्या आक्रमणाची दिशा सनातनच्या आश्रमात राहून पूर्ण साधना करणार्या साधकांकडे वळवली आणि त्यांच्यावर उर्वरित ६० टक्के आक्रमण केले. तेव्हा साधकांचे रक्षण करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देहातून श्रीकृष्णमय चैतन्याचा झोत रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षात असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये कार्यरत झाला आणि या चित्रातील श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्राचे एक लघुरूप असुरांच्या दिशेने वातावरणात प्रक्षेपित झाले. त्यामुळे असुरांचे उर्वरित ६० टक्के सूक्ष्मातील आक्रमण नष्ट झाले. तेव्हा या चक्राच्या आर्यांचा स्पर्श चित्राला घातलेल्या फुलांच्या माळेला होऊन तिला भेदून सुदर्शनचक्र पुढे गेले. त्यामुळे ४.७.२०२३ या दिवशी दुपारी ४ वाजता रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षात असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राला घातलेल्या हारातील काही फुले गळून पडल्याचे लक्षात आले. या सुदर्शनचक्राने आश्रमातील साधकांवर होणारे असुरांचे आक्रमण परतवून लावले.
३. तात्पर्य
यावरून आपल्या लक्षात येते की, देवतेचे चित्र सात्त्विक असेल, तर त्यामध्ये संबंधित देवतेची शक्ती आणि चैतन्य कार्यरत होऊन ते समष्टीच्या कल्याणासाठी वायूमंडलात वेगाने प्रक्षेपित होते. तसेच संत, सद़्गुरु आणि परात्पर गुरु यांच्यामध्ये संबंधित देवतांचे तत्त्व आवश्यकतेनुसार प्रगट होऊन ते असुरांशी लढते. वरील अनुभूतीतून सूक्ष्मातून घडलेल्या दैवी लीलेची प्रचीती आपल्याला स्थुलातून मिळाली. यावरून ‘सूक्ष्मातून घडलेल्या घडामोडींचे पडसाद स्थुलातूनही कसे उमटतात ?’, हे आपल्याला शिकायला मिळाले. सनातनच्या आश्रमातील साधक, संत आणि सद़्गुरु हे भगवान श्रीकृष्णरूपी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवून पूर्णवेळ झोकून देऊन सेवा करत आहेत. त्यामुळेे त्यांच्यावर असुरांनी केलेल्या सूक्ष्मातील आक्रमणाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील श्रीकृष्णतत्त्वानेच साधकांचे रक्षण केले. यालाच ‘भगवंताच्या अस्तित्वाची अनुभूती स्थुलातून येणे’, असे म्हणतात.
४. कृतज्ञता
भगवंताने ही अनुभूती दिल्याबद्दल त्याच्या चरणी कोटीशः नमन करते.’
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७ .८.२०२३, दु. १२.२४)
|