खलिस्तानी आतंकवादी पन्नू याची चिथावणी

नवी देहली – देहलीत जी-२० शिखर परिषद उधळून लावण्याचा डाव खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘शीख फॉर जस्टिस’ने ‘आय.एस्.आय.’ या पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या इशार्यावर रचला आहे. ‘शीख फॉर जस्टिस’चा प्रमुख आतंकवादी गुरपतवंतसिंह पन्नू हा काश्मिरी लोकांना भडकावत आहे. पन्नू याने ‘आय.एस्.आय.’च्या ‘के-२ फॉर्म्युल्या’च्या (के-२ म्हणजे काश्मीर- खलिस्तान) धर्तीवर एक ध्वनीफीत प्रसारित केली आहे. यामध्ये त्याने काश्मिरी लोकांना काश्मीर सोडून देहलीवर आक्रमण करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर देहलीत जी-२० परिषदेच्या वेळी खलिस्तानी आतंकवाद्यांकडून आक्रमणाची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षादलाने अतीदक्षतेचे आदेश दिले आहेत.
‘जुमे की नमाज के बाद प्रगति मैदान के लिए निकलो’: G20 समिट से पहले खालिस्तानी पन्नू ने कश्मीरी मुस्लिमों को भड़काया, हाई अलर्ट पर दिल्ली#G20Summit2023 #Khalistanihttps://t.co/0AEdOYVlAU
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 3, 2023
या ध्वनीफितीमध्ये खलिस्तानी आतंकवादी पन्नू याने मुसलमानांना शुक्रवारच्या नमाजानंतर देहलीतील प्रगती मैदानाकडे कूच करण्यास सांगितले आहे. तसेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर खलिस्तानी ध्वज फडकावण्याची धमकी दिली आहे. ९ ते १२ सप्टेंबर या कालावधीत देहलीत जी-२० शिखर परिषद होणार आहे. या शिखर परिषदेला जगातील प्रमुख नेते उपस्थित रहाणार आहेत.
“कश्मीर घाटी छोड़कर दिल्ली आओ”, G20 सम्मेलन से पहले खालिस्तानी आतंकी पन्नू ने कश्मीर के मुसलमानों को भड़काते हुए उगला जहर#khalistani #Gurupatwantsinghpannu #g20summit #Delhi #DelhiNewshttps://t.co/BAXqBICVtP
— Bharat Express (@BhaaratExpress) September 4, 2023
संपादकीय भूमिकाखलिस्तान्यांना धडा न शिकवल्यामुळे ते अधिकाधिक उद्दाम होऊन अशा प्रकारे चिथावण्या देत आहेत. त्यांना जन्माची अद्दल घडेल, अशी कृती सरकारने करणे अपेक्षित ! |
कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !
Puneeth kerehalli : हिंदुत्वनिष्ठ पुनीत केरेहळ्ळी यांना पोलिसांकडून रायचुरू जिल्हाबंदी
पतीने खोटा जन्मदिनांक सांगितल्याने जन्मकुंडली जुळवण्यात चूक होणे, ही पत्नीची फसवणूक ! – Telangana High Court
Tukaram Mundhe Action : रुग्णालयातून औषधे खरेदी करण्याची सक्तीची केल्यास कारवाई होणार !
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) बसस्थानकावर अपुर्या फलाटांमुळे प्रवाशांचे हाल !
सहारनपूर (उत्तरप्रदेश) : ‘श्री गोगा मढी’ तीर्थक्षेत्राला मौजमजेचे केंद्र बनवल्यावरून विरोध !