कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकणारी मुले निराशेत जात असल्याचे आढळून आले आहे. कॉन्व्हेंट शाळांमध्ये जाणारी मुले आपली भारतीय संस्कृती विसरतात; याउलट सनातन हिंदु धर्माचे शिक्षण आणि आचरण केलेली मुले आत्मबळाने युक्त असतात.
– डॉ. पूजा, संयुक्त अध्यक्षा, कस्तुरबा विद्यानिकेतन, धोरी, झारखंड.
‘कॉन्व्हेंट शाळांमध्ये विशिष्ट अटी ठेवून शिक्षण दिले जाते; मात्र तेथे शिक्षण घेणारी बहुतांश मुले ही हिंदू असतात. कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकलेले विद्यार्थी हिंदु संस्कृतीपासून दूर जात आहेत. ‘इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेला विद्यार्थीच यशस्वी होईल’, या गैरसमजातून पालकांनी आता बाहेर आले पाहिजे. ‘विद्यार्थी संस्कारी झाल्यावरच यशस्वी होईल’, हे लक्षात घेतले पाहिजे. आधुनिक शिक्षण देण्यासह संस्काराचे शिक्षण देणारी विद्यालये आपल्या मुलांसाठी निवडा !’
– गौरी द्विवेदी, मुख्याध्यापिका, रुद्रप्रयाग विद्या मंदिर, उत्तरप्रदेश