
इस्लामाबाद – सौदी अरेबियाने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. जी-२० परिषदेसाठी भारतात येणारे सौदी अरेबियाचे राजकुमार तथा पंतप्रधान महंमद बिन सलमान यांनी त्यांचा पाकिस्तान दौरा स्थगित केला आहे. लाहोरस्थित एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यातील विचारविनिमयानंतर सौदी राजपुत्राचा इस्लामाबाद दौरा रहित करण्यात आला.
जी-२० परिषदेसाठी भारतात येण्यापूर्वी राजकुमार महंमद बिन सलमान पाकिस्तानला भेट देणार होते. ११ सप्टेंबर या दिवशी महंमद बिन सलमान भारताच्या दौर्यावर येणार आहेत. वर्ष २०१९ मध्ये महंमद बिन सलमान यांनी पहिल्यांदाच भारताला भेट दिली होती. त्या वेळी ते सौदीचे उपपंतप्रधान होते.
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump
अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेकडून भारतविरोधी लेख मागे !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation