१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सत्संगात एका साधिकेला खाऊ दिल्यावर साधिकेच्या मनात ‘स्वतःला खाऊ दिला नाही’, असा अयोग्य विचार येणे आणि काही वेळाने तिला याची जाणीव होऊन स्वतःतील अहंची तीव्रता लक्षात येणे अन् तिने परात्पर गुरुदेवांची मानस क्षमायाचना करणे
‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात त्यांनी एका साधिकेला खाऊ (प्रसाद) दिला. त्या वेळी माझ्या मनात ‘त्यांनी मला खाऊ दिला नाही’, असा अयोग्य विचार आला. माझ्या मनात हा विचार काही वेळ राहिला. नंतर मला जाणीव झाली, ‘मला साक्षात् भगवंताचे दर्शन घडले, तर या स्थुलातील खाऊत अडकणे अयोग्य आहे.’ मला माझ्यातील अहंची तीव्रता लक्षात आली आणि मी परात्पर गुरुदेवांची मानस क्षमायाचना केली.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दुसर्या वेळी सत्संगात त्याच साधिकेला खाऊ दिल्यावर स्वतःच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया !
२ अ. दुसर्या वेळी पुन्हा असेच झाले. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या साधिकेला खाऊ दिला आणि मला दिला नाही; परंतु तेव्हा माझ्या मनात ‘त्यांनी मला खाऊ दिला नाही’, असा विचार आला नाही.
२ आ. पुराणातील श्रीकृष्ण आणि राधा यांच्या संदर्भातील प्रसंग आठवणे : मला पुराणातील एक प्रसंग आठवला, ‘एकदा राधेला विचारले होते, ‘तुला श्रीकृष्ण मिळाला, तर तू त्याच्याकडे काय मागशील ?’ त्या वेळी राधेने उत्तर दिले, ‘जर श्रीकृष्ण भेटला, तर आणखी काही मागणे शेष रहातच नाही. तो मिळाला म्हणजे सर्वच मिळाले.’ हा प्रसंग आठवून ‘मला खाऊ हवा’, असे मला वाटले नाही.
२ इ. अंतर्यामी परात्पर गुरु डॉ. आठवले !
माझ्या मनात असे विचार आल्यानंतर दुसर्याच क्षणी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला विचारले,
परात्पर गुरु डॉ. आठवले : आता तुला खाऊ दिला नाही, तर चालेल ना ? देवाने तुला खाऊपेक्षा किती दिले आहे !
मी : हो. प.पू. गुरुदेव, खाऊ तर स्थुलातील आहे. तुम्ही सूक्ष्मातून माझ्या समवेत सतत आहात आणि आता स्थुलातूनही तुमचे दर्शन झाले आहे. यापेक्षा मला आणखी काय हवे ?
माझे बोलणे ऐकून प.पू. गुरुदेव मिष्कीलपणे हसले. त्यांनी सारे काही आधीच जाणले होते.
या प्रसंगातून मला ‘परात्पर गुरुदेव अंतर्यामी आहेत’, याची प्रचीती आली. ते माझ्या मनातील प्रत्येक विचार ऐकतात आणि माझ्या मनातील अयोग्य विचार काढून टाकतात.
परात्पर गुरु डॉक्टर, तुम्हाला सारे काही ठाऊक आहे. तुम्ही तुमच्या या अज्ञानी बालकाची अशा निरनिराळ्या माध्यमांतून परीक्षा घेता. माझ्या मनात
‘अज्ञान, संशय और विपरीत विचारों से भरे ।
मेरे मन के अंधकार को दूर करे, वचनामृत से अपने ।
हे गुरुदेव, कैसी आपकी अगाध कृपा’ ।।
या पंक्ती येऊन माझी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.’
– परात्पर गुरुदेवांची,
कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), फोंडा, गोवा. (८.९.२०२२)
|