कोटा (राजस्थान) येथे २ विद्यार्थ्यांनी केल्या आत्महत्या !

  • लातुर येथील एका विद्यार्थ्याचा समावेश !

  • यावर्षी आतापर्यंत २२ विद्यार्थ्यांनी केल्या आत्महत्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोटा (राजस्थान) – येथे महाराष्ट्राच्या लातुरमधील आविष्कार संभाजी कासले  (वय १६ वर्षे) या विद्यार्थ्याने इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. आदर्श नावाच्या अन्य एका विद्यार्थ्याने खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तो बिहारच्या रोहतास जिल्ह्यात रहाणारा होता. तोही आविष्कारप्रमाणे ‘एन्.ई.ई.टी.’ परीक्षेच्या सिद्धतेसाठीच आला होता. या दोघांनी चाचणी परीक्षेमध्ये अल्प गुण मिळाल्याच्या ताणातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. यावर्षी आतापर्यंत कोटामध्ये २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी पुढील २ मास सर्व प्रकारच्या परीक्षांवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. कोटा शहर देशात ‘कोचिंग इन्स्टिट्यूट’साठी प्रसिद्ध आहे. येथे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या शिकवणीसाठी देशभरातून विद्यार्थी येत असतात; मात्र शिक्षणाच्या ताणामुळे हे विद्यार्थी आत्महत्या करतात, असे दिसून येत असते. आत्महत्या करणारा आविष्कार कासले हा गेल्या ३ वर्षांपासून येथे ‘एन्.ई.ई.टी.’ (नीट) परीक्षेची सिद्धता करत होता.

संपादकीय भूमिका

  • विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देऊन साधनेचा संस्कार न केल्याचाच हा परिणाम आहे ! मनुष्यजन्माचा उद्देशच न कळल्यामुळे शिक्षणाचा, भविष्याचा विचार करून ताण घेऊन आत्महत्या केल्या जात आहेत. हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रात प्रत्येकाला साधना शिकवली जाईल !