निवेदन न स्वीकारण्यास शाळा सुधारणा समितीच्या धर्मांध सदस्याकडून मुख्याध्यापकांवर दबाव !

मडिकेरी (कर्नाटक) येथील सरकारी शाळेत हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी निवेदन देण्याचा प्रयत्न

मडिकेरी (कर्नाटक) – येथील नापोकलुमधील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत काही धर्मप्रेमी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ याविषयी निवेदन देण्यासाठी १० ऑगस्ट या दिवशी गेले होते. या वेळी मुख्याध्यापकांच्या शेजारी ‘शाळा सुधारणा समिती’चे सदस्य असलेले एक धर्मांध सदस्य बसले होते. निवेदन पत्राच्या शिरोभागी असलेले ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती’ हे नाव पाहून त्यांना राग आला. ‘ही सरकारी शाळा आहे. येथे अशा गोष्टींना स्थान नाही’, असे ते म्हणाले. तेव्हा निवेदन द्यायला गेलेले धर्मप्रेमी म्हणाले, ‘‘हा राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचा विषय आहे. मुलांसाठी अत्यावश्यक आहे.’’ त्यावर धर्मांध सदस्य म्हणाले, ‘आमच्याकडे ‘डी.एड्.’ (डिप्लोमा इन एज्युकेशन) झालेले शिक्षक आहेत. आम्हाला याची आवश्यकता नाही’, असे सांगत ‘निवेदन स्वीकारू नये’, अशी मुख्याध्यापकांना तंबी दिली. त्यामुळे मुख्याध्यापकांनी निवेदन स्वीकारले नाही.
एवढ्यावरच न थांबता या धर्मांध सदस्याने या शाळेच्या शेजारी असलेल्या दुसर्‍या शाळेच्या मुख्याध्यापकांना दूरभाष करून ‘तुम्ही हिंदु जनजागृती समितीचे निवेदन स्वीकारू नका’, असा दबाव आणला.

संपादकीय भूमिका 

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अशा २ घटना आतापर्यंत घडल्या आहेत. यातून भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना काँग्रेसच्या राज्यात कर्नाटकमध्ये इस्लामी राजवट आली आहे, असेच निदर्शनास येत आहे. काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?