हिंदुत्वनिष्ठ वृत्तसंकेतस्थळ ‘ऑप इंडिया’ची माहिती !
नवी देहली – ‘भगवा लव्ह ट्रॅप’च्या नावाखाली हिंदु पुरुष आणि मुसलमान महिला ही विवाहित जोडपी अथवा त्यांच्यातील प्रेम प्रकरणे शोधून काढून त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी धर्मांध मुसलमानांकडून योजनाबद्ध हिंसाचार करण्यात आला. संबंधित मुसलमान महिलांवर लैंगिक अत्याचारही करण्यात आले, तसेच सार्वजनिकरित्या त्यांचा अवमान करण्यात आला. ‘ऑप इंडिया’ या हिंदुत्वनिष्ठ वृत्त संकेतस्थळाने यासंदर्भातील भयावह प्रकार उघड केला आहे. वृत्त संकेतस्थळाने दावा केला की, गेल्या काही मासांत त्यांना अशी ५० हून अधिक प्रकरणे मिळाली, ज्यामध्ये हिंदु पुरुष आणि मुसलमान महिला यांचे एकमेकांवर प्रेम होते अन् त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले.
Exclusive: ‘भगवा लव ट्रैप’ के नाम पर हिंदू लड़के-मुस्लिम लड़की टारगेट पर, हमलों के लिए वॉट्सऐप ग्रुप में प्लानिंग; पाकिस्तानी भी शामिल#BhagwaLoveTrap जैसा शब्द कहाँ से आया, इसकी आड़ में साजिश कौन रच रहा? @LekhakAnurag की पोल-खोल रिपोर्टhttps://t.co/zSdxybvn6j
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 17, 2023
१. ‘ऑप इंडिया’ने प्रकाशित केलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हिंदू कधीच स्वत:ची ओळख लपवून कुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढत नाहीत. असे असतांना ‘भगवा लव्ह ट्रॅप’ नावाच्या कपोलकल्पित नावाखाली व्हॉट्सअॅप गटांच्या माध्यमातून मुसलमानांना भडकावण्यात आले.
२. ‘ऑप इंडिया’ने दावा केला आहे की, ‘बहन बेटी बचाओ’ नावाच्या एका व्हॉट्सअॅप गटात काही पाकिस्तानी लोक सहभागी आहेत. या गटाच्या विवरणात लिहिले आहे की, ‘भगव्या आतंकवादापासून आपल्या बहिणी आणि मुली यांचे रक्षण करण्यासाठी काय करायला हवे, याविषयी तुमची मते कळवा !’ गटाच्या ‘डिस्प्ले फोटो’वर गेल्या वर्षी कर्नाटकात झालेल्या हिजाब वादाच्या प्रकरणात हुब्बळ्ळी येथे हिंदूंसमोर ‘अल्ला हू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’च्या) घोषणा देणारी बुरखाधारी विद्यार्थिनी मुस्कान हिचे छायाचित्र आहे. हा गट आधी केवळ महाराष्ट्रापुरता सीमित होता. आता तो संपूर्ण भारतात कार्यरत आहे. या गटात अनेक चिथावणीखोर व्हिडिओ पोस्ट करण्यात येत आहेत.
३. या गटातून प्रसारित एक पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे की, भारतात रा.स्व.संघ प्रतिवर्षी १० लाख मुसलमान मुलींना हिंदू बनवत आहे. महाराष्ट्रातील अमरावती शहरात ८०० मुसलमान महिलांचे धर्मांतर करून त्यांचा विवाह लावण्यात आला. (अशी माहिती प्रसारित करून हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अपकीर्त करणारे धर्मांध ! – संपादक)
४. या गटात हिंदु पुरुष आणि मुसलमान महिला यांची माहिती प्रसारित करून त्यांच्यावर आक्रमण करण्याची योजना आखली जाते. या गटातील माहिती आक्रमणकारी मुसलमानांना दिली जाते. ते दोघा पुरुष-महिला यांची रेकी करतात आणि योग्य वेळ आली की, त्यांच्यावर आक्रमण करतात.
५. वाहिद नावाच्या एका मुसलमानाने या गटावर एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये हिंदु पुरुष आणि मुसलमान महिला यांच्या विवाहाची माहिती कशी शोधायची, याविषयी सांगण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये ‘विशेष विवाह कायदा – १९५४’च्या अंतर्गत झालेल्या विवाहांची सविस्तर माहिती महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावरून घेता येते, असे सांगण्यात आले आहे. यातून माहिती काढून धर्मांध मुसलमान संबंधित जोडप्याला लक्ष्य करतात.
६. ‘बहन बेटी बचाओ’ हा गट व्हॉट्सअॅपवरील ‘इस्लामिक हिस्ट्री’ आणि ‘ओनली इस्लामिक ग्रुप लिंक्स’ यांसारख्या धर्मांध मुसलमानांच्या अन्य गटांशीही समन्वय ठेवतो.
७. फेसबुकवर मुसलमान महिलांच्या नावाने खाती उघडून हिंदु पुरुषांना त्यांच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. यामध्ये ‘मुसलमान मुलींच्या गटांमध्ये जोडा’ अशा प्रकारचा गट बनवण्यात आला असून त्याचे २० लाख सदस्य आहेत.
संपादकीय भूमिका
|