
नवी देहली – यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त लाल किल्ल्याभोवती सुरक्षादलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवासोबतच ‘जी-२०’ची झलकही पहायला मिळणार आहे. १५ ऑगस्टला होणारी पतंगबाजी लक्षात घेऊन सुरक्षाव्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने लाल किल्ल्याच्या सभोवती सुलतान (पतंग पकडणारे) आणि पोलीस कमांडो तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी अनेक आधुनिक सुरक्षा उपकरणांचा वापर केला जाणार आहे.
१. चेहरा ओळखण्याच्या आधुनिक प्रणालीसह सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये आतंकवाद्यांची माहिती जतन केली जाईल. ही माहिती लाल किल्ल्यावर उभारण्यात येणार्या सुरक्षा नियंत्रण कक्ष पाहू शकणार आहे. चेहरा ओळखण्याच्या प्रणालीला संशयास्पद चेहरा आढळताच सुरक्षा नियंत्रण कक्षाला तात्काळ सतर्क संदेश प्राप्त होईल.
२. लाल किल्ल्याच्या सुरक्षेत प्रतिवर्षीप्रमाणे चांदणी चौक रस्त्यावरही उंच कंटेनर उभे केले जात आहेत. लाल किल्ल्याची सुरक्षा जमिनीपासून आकाशापर्यंत अभेद्य करण्याचे काम चालू आहे.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आतंकवाद्यांच्या सावटाखाली साजरे करावे लागणे, हे राज्यकर्त्यांना लज्जास्पद ! |
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
‘शौर्य प्रशिक्षण शिबिरा’त ३२५ हून अधिक तरुण-तरुणींनी घेतला सहभाग !
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची स्थगिती !
श्री चांगदेव महाराजांच्या मंदिरात धर्मांधांकडून अतिक्रमण !