विधान परिषद प्रश्नोत्तरे…

मुंबई, २७ जुलै (वार्ता.) – मुख्याधिकारी वर्ग-१ या पदावर विभागीय चौकशी चालू असतांना पदोन्नती दिल्याविषयीच्या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी २६ जुलै या दिवशी विधान परिषदेत दिली. याविषयीचा तारांकित प्रश्न सदस्य सुरेश धस यांनी उपस्थित केला होता.
मंत्री सामंत म्हणाले की, पदोन्नतीच्या विचारक्षेत्रातील अधिकार्यांसंदर्भात विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण चालू आहे किंवा कसे ही गोष्ट विचारात घेऊन पदोन्नती समितीकडून निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे मुख्याधिकारी वर्ग-१ या पदावर विभागीय चौकशी चालू असतांना पदोन्नती दिली. याविषयीच्या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून सभागृहातील सदस्यांना याविषयी अवगत करण्यात येणार आहे.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा