‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’च्‍या पाचव्‍या दिवसाचे (२० जून २०२३ या दिवशीचे) सूक्ष्म परीक्षण

‘२० जून २०२३ या दिवशी रामनाथ देवस्‍थान येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’त वक्‍त्‍यांनी मार्गदर्शन केले. त्‍या वेळी देवाने आमच्‍याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

श्री. राम होनप                           श्री. निषाद देशमुख                                      कु. मधुरा भोसले

१. अधिवक्‍त्‍या (श्रीमती) रचना नायडू, छत्तीसगड

अधिवक्‍त्‍या (श्रीमती) रचना नायडू

अ. अधिवक्‍त्‍या (श्रीमती) रचना नायडू हिंदुत्‍वनिष्‍ठ, सत्‍यनिष्‍ठ आणि तत्त्वनिष्‍ठ आहेत, तसेच त्‍यांच्‍यात धर्म आणि संस्‍कृती यांच्‍याप्रती पुष्‍कळ तळमळ आहे.

आ. त्‍या करत असलेले वक्‍तव्‍य क्षात्रभावयुक्‍त असल्‍यामुळे श्रोत्‍यांमध्‍ये संघर्ष करण्‍याची वृत्ती निर्माण होते.

इ. त्‍यांच्‍या मनात भगवंताप्रती भाव आहे. त्‍यामुळे राष्‍ट्राचे कार्य करतांना त्‍यांना देवाचे साहाय्‍य मिळते.

२. श्री. अर्जुन संपथ, संस्‍थापक अध्‍यक्ष, हिंदु मक्‍कल कत्‍छी, तमिळनाडू

श्री. अर्जुन संपथ

अ. श्री. अर्जुन संपथ यांच्‍यातील धर्मतेज, क्षात्रतेज, संघटन कौशल्‍य आणि नियोजनकौशल्‍य यांच्‍यात वाढ झाल्‍याने त्‍यांच्‍याकडून तमिळनाडूमधील हिंदूंचे संघटन केले जात आहे.

आ. त्‍यांना धर्मकार्य करतांना यशाची अपेक्षा नसते. त्‍यामुळे काही प्रसंगी कार्य करतांना यश न मिळल्‍यास खचून न जाता त्‍यांना स्‍थिर रहाता येते.

इ. श्री. संपथ यांच्‍या साधनेमुळे श्रोत्‍यांमध्‍ये धर्मकार्य करण्‍याची स्‍फूर्ती निर्माण होते. त्‍यांची धर्मकार्याच्‍या माध्‍यमातून साधना होत आहे.

३. श्री. सतीश कुमार, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, गौरक्षा दल

श्री. सतीश कुमार

अ. श्री. सतीश कुमार यांच्‍यात भोळा भाव, निर्भयता, वीरता आणि क्षात्रवृत्ती आहे. त्‍यांची गौमाता आणि धर्म यांवरदृढ श्रद्धा आहे.

आ. त्‍यांच्‍या मनावर साधनेचे महत्त्व बिंबले आहे. त्‍यामुळे कारावासासारख्‍या कठीण परिस्‍थितीलाही सहजतेने स्‍वीकारून ते तेथे साधना करू शकले. ते धर्माप्रती पूर्णपणे समर्पितहोऊन कार्य करतात.

– श्री. राम होनप, कु. मधुरा भोसले (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के) आणि श्री. निषाद देशमुख (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.६.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.