श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी गंभीर घायाळ !

बेळगाव – येथे विश्व हिंदु परिषदेच्या आंदोलनात भाग घेण्यासाठी शिवापूर येथून बेळगावकडे येणार्या अल्टो वाहनाने समोर निघालेल्या कंटनेरला मागून धडक दिल्यानंतर कारला तिच्या मागून येणार्या दुसर्या एका कंटनेरने धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात २ जण जागीच ठार, तर शिवापूर मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी हे गंभीर घायाळ झाले आहेत. स्वामीजींना येथील सिव्हिल रुग्णालयात अतीदक्षता विभागात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. १७ जून या दिवशी सकाळी १०.३० वाजता पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला.
हा अपघात एवढा भयानक होता की, २ कंटेनरमध्ये सापडलेल्या अल्टो कारचा पूर्णपणे चेंदामेदा झाला. दैव बलवत्तर म्हणून श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी या अपघातातून बचावले आहेत. या अपघातात पांडुरंग मारुति जाधव आणि पांचाक्षरय्या बसय्या हिरेमठ हे ठार झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच काकतीचे पोलीस निरीक्षक विजय शिन्नूर यांनी त्यांच्या सहकार्यांसह घटनास्थळी येऊन पंचनामा केला, तसेच मृतदेह उत्तरीय पडताळणीसाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवले आहेत. अपघातग्रस्त झालेले सर्वजण बेळगाव येथे झालेल्या विश्व हिंदु परिषदेच्या धर्मांतरबंदी कायदा रहित विरोधी आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोल्हापूर येथून निघाले होते. या अपघाताची काकती पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
भित्तीपत्रक लावणार्या महिला अधिकार्याचे स्थानांतर ! – नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त
देवस्थान इनाम भूमींच्या संदर्भातील प्रारूप सिद्ध करण्यासाठीच्या समितीत देवस्थानांच्या प्रतिनिधींचा समावेश !
(म्हणे) ‘हिंदूंना विभागण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागेल !’ – Maulana Sajjad Nomani
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिराच्या दानाची चोरी करणार्याच्या ७ पिढ्यांना शाप लागेल !
अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !