नोएडा (उत्तरप्रदेश) येथे शहाळ्यावर गटाराचे पाणी शिंपडणार्‍या समीर खान याला अटक

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथे शहाळे विकणार्‍या समीर खान याला पोलिसांनी अटक केली आहे. शहाळ्यांवर गटारातील पाणी शिंपडत असल्याचा त्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. येथील ‘श्री राधा कृष्ण स्काय गार्डन’ या इमारतीजवळ ही घटना घडली.

अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये उत्तरप्रदेशच्या बिजनौर येथे महंमद शरीफ हा भाजीविक्रेता भाज्यांवर लघवी करून हिंदूंना विकत होता, असे समोर आले होते. तसेच तंदुरी रोटी बनवतांना त्यावर मुसलमानांकडून थुंकण्यात येत असल्याचीही काही प्रकरणे उघडकीस आली होती.

संपादकीय भूमिका

अशा मानसिकतेच्या लोकांकडून कुणी काहीही खरेदी करू नये, असेच जनतेला वाटणार !