भारत उत्पादनात, तर पाकिस्तान मधुमेहाच्या आजारात जगात अव्वल !

पाकिस्तानी पत्रकाराने ढाळले अश्रू

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानातील प्रसिद्ध पत्रकार वजाहत खान यांनी ट्वीट करत ‘भारत उत्पादनाविषयी जगात प्रथम क्रमांकावर असतांना, पाकिस्तान मात्र मधुमेहाच्या आजाराच्या सूचीमध्ये जगात अव्वल आहे’, असे म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये आळस आणि आजार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे या सूचीतून दिसून येते. या सूचीत पाकिस्तानमध्ये मधुमेहाचे प्रमाण ३०.८ टक्के आहे. दुसरीकडे उत्पादनाच्या सूचीत भारत पहिल्या क्रमांकावर असून चीन दुसर्‍या क्रमांकावर, तर व्हिएतनाम तिसर्‍या क्रमांकावर आहे.

संपादकीय भूमिका

भारतद्वेषात आकंठ बुडालेल्या पाकला स्वतःच्या जनतेच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे कुठे ?