‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी महान क्रांतीकार्य करण्यासह अंदमानातील कारागृहात असतांना हिंदु बंदीवानांवर होणार्या अत्याचारांविरुद्ध तुम्ही दिलेला लढा, अतोनात शारीरिक आणि मानसिक यातना सोसूनही देशासाठी मृत्यूसमोर हार न पत्करण्याचा केलेला दृढ निर्धार, अंदमानातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हिंदूंच्या शुद्धीकरणाची आणि संघटनाची केलेली खटपट, हिंदूंतील जातीभेदाविरुद्ध उभारलेला यशस्वी लढा… हे सारेच साहसी, अद्वितीय अन् म्हणूनच अविस्मरणीय आहे.
आज हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी चळवळी आणि संघटनात्मक कार्य करणारे हिंदु धर्म आणि राष्ट्र प्रेमी, धर्म अन् राष्ट्र द्रोह्यांचे आघात सोसत असणारे हिंदु बांधव, समष्टी प्रारब्धाचाच एक भाग म्हणून तीव्र शारीरिक आणि मानसिक त्रास भोगत दिवस कंठणारे साधक… अशा आम्हा सार्यांनाच तुमचा अभिमान आहे. तुमचाच ध्येयमंत्र आम्ही पुन्हा पुन्हा आळवू आणि शेवटच्या श्वासापर्यंत झुंजत राहू…
की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने ।
लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने ।
जे दिव्य दाहक म्हणोनि ।
बुद्धयाचि वाण धरिले करि हे सतीचे ।।
‘श्री गुरु आम्हा सर्वांकडून अविरतपणे राष्ट्र आणि धर्म कार्य करवून घेत राहो’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना !’
– (पू.) संदीप आळशी, रामनाथी आश्रम, गोवा. (१९.५.२०१६)