जीवनाविषयी सावरकरांचा दृष्टीकोन असामान्य असा आहे. स्वाभिमानाने जीवन जगणार्या आणि सर्वस्वाचा त्याग करत मृत्यूला आलिंगन देणार्या जीवनाविषयी सावरकरांना आकर्षण आहे. असे जीवन मोक्षदायी पावन होणारे जीवन आहे, असा त्यांचा दृढविश्वास आणि धारणा आहे. हा जीवन सिद्धांत एक आदर्श म्हणून सर्वांसमोर ठेवतांना सावरकर म्हणतात,
अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती । कोणी त्यांची महती गणती, ठेविली असे ॥
परी जे गर्जेद्रशुंडेने उपटिले, श्रीहरीसाठी मेले । कमलफूल ते अमर ठेले, मोक्षदाते पावन ॥’
– प्राचार्य शाम मो. देशपांडे (‘स्वातंत्र्यवीर’ दिवाळी विशेषांक २०१०)