|

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील शास्त्रीनगरमध्ये असणार्या एका उपाहारगृहामध्ये हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांकडून बुद्धीभेद केला जात असून येथे ‘लव्ह जिहाद’साठी एक केंद्र चालवले जात असल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी येथे धाड घातली. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी बजरंग दलाच्या आरोपावरून चौकशी चालू केली आहे. ‘हंगर हेड’ असे या उपाहारगृहाचे नाव आहे.
१. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच्या वेळी या उपाहारगृहात प्रवेश केल्यावर तेथे एका भिंतींवर हिंदु तरुणी आणि मुसलमान तरुण यांची नावे लिहिण्यात आल्याचे आढळून आले. तसेच काही आक्षेपार्ह लिखाणही दिसले.
२. याविषयी विश्व हिंदु परिषदेचे महानगर सह धर्म प्रसार प्रमुख श्री. अश्वनी गुप्ता यांनी सांगितले की, येथील भिंतींवर अश्लील लिखाण केलेले होते. उपाहारगृहात काम करणार्यांकडे अश्लील साहित्यही सापडले. पोलिसांनी या प्रकरणी ४ जणांना कह्यात घेतले आहे.
३. या उपाहारगृहाचे मालक अरुण यांनी सांगितले की, आमच्या उपाहारगृहात लावलेल्या फलकावर उपाहारगृहाला भेट देणार्यांच्या प्रतिक्रिया लावण्यात आल्या असतात. (स्वतःच्या मालकीच्या उपाहारगृहामध्ये अशी कृत्ये चालू असतांना त्याविषयी सारवासारव करणार्या मालकाला हिंदूंनी वैध मार्गाने खडसावणे आवश्यक ! – संपादक)
४. पोलीस निरीक्षक सुबोध सक्सेना यांनी अरुण यांना त्यांच्या उपाहारगृहातील भिंतींवर लिहिण्यात आलेला मजकूर हटवण्यास सांगितले आहे.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !