जळगाव येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या घरांवर दगडफेक : १ हिंदु घायाळ

धर्मांधांवर गुन्हे नोंद न करणार्‍या पोलीस निरीक्षकांची पोलीस अधीक्षकांकडून कानउघाडणी !

जळगाव, १८ मे (वार्ता.) – शहरातील मासूमवाडी येथे १७ मे च्या रात्री ९ वाजता ७० ते ८० धर्मांधांनी हिंदूंच्या घरांवर दगडफेक करून हिंदूंच्या ४-५ दुचाकी आणि २ मालवाहतूक वाहने यांची तोडफोड केली. यात १ हिंदु घायाळ झाला. या प्रकरणी पोलिसांनी केवळ ८ जणांवर गुन्हा नोंद करून जुजबी कारवाई केली. धर्मांधांवर गुन्हे नोंद करण्याच्या हिंदूंच्या मागणीची पोलीस निरीक्षक हिरे यांनी गांभीर्याने नोंद घेतली नाही. ५ हिंदूंवर गुन्हे नोंद करण्याचा त्यांचा हेतू होता. जागरूक हिंदूंनी पोलीस अधीक्षक एम्. राजकुमार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी हिरे यांची कानउघाडणी करत २० ते २५ धर्मांधांवर गुन्हे नोंद करून त्यांना अटक करण्याचे आदेश दिले.

१. एका मुसलमानाचा वाढदिवस ते सर्वजण रस्त्यावर उभे राहून साजरा करत होते. त्यांनी एकमेकांना अंडी फेकून मारली. ते हिंदु वसाहतीच्या जवळ आल्यावर गोंधळ घालू लागल्याने काही नागरिकांनी त्यांना हटकले.

२. धर्मांधांनी हिंदूंना अंडी फेकून मारली, तसेच ३ हिंदूंना मारहाण केली. हिंदूंना शिवीगाळ करून हिंदूंची घरे, महिला, वृद्ध नागरिक आणि मुले यांच्यावर दगडफेक केली. धर्मांधांच्या हातात तलवार, रॉड, लोखंडी पाईप, काठ्या होत्या. हे पूर्वनियोजित आक्रमण असल्याचे प्रत्यक्षदर्शी हिंदूंनी सांगितले.

३. घटनास्थळी आलेल्या पोलिसांवरही धर्मांधांनी दगडफेक केल्यामुळे २ पोलीस घायाळ झाले. या दगडफेकीत एका हिंदूंचे डोके फुटून ३ टाके पडले.

४. याविषयी सीसीटीव्हीत झालेल्या घटनेचे चित्रण हिंदूंनी पोलिसांना दाखवले. काही मुसलमान त्यांच्या अधिवक्त्यांना घेऊन पोलीस ठाण्यात आले. धर्मांधांविरुद्ध गुन्हे न नोंद करण्यासाठी पोलीस निरीक्षक हिरे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू लागले. यानंतर मोठ्या संख्येने हिंदूही तेथे आले. ७०-८० धर्मांधांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी हिंदूंनी केली; मात्र हिरे यांनी ‘८ धर्मांधांवर गुन्हे नोंद केले आहेत, असे सांगून ५ हिंदूंची नावे देण्यास सांगितले.’ हिरे हे हिंदूंवरही गुन्हे नोंद करणार असल्याचे लक्षात येताच हिंदुत्वनिष्ठांनी ही नावे देण्यास नकार दिला.

५. हिरे यांनी ‘३ हिंदूंची नावे सांगावीच लागतील’, असा दम दिला. याला हिंदूंनी विरोध केला. ‘तुम्ही या घटनेची योग्य नोंद न घेतल्यास तुमच्या विरोधात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रार करून उद्या मोर्चाही काढू’, अशी चेतावणी हिंदूंनी हिरे यांना दिली.

६. हिंदूंनी पोलीस अधीक्षक एम्. राजकुमार यांना भेटून पोलीस निरीक्षक हिरे हे धर्मांधांवर गुन्हे नोंद करण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. याविषयी त्यांनी हिरे यांना ‘२०-२५ धर्मांधांवर विविध कलमांअन्वये गुन्हे नोंद करावेत’, असा आदेश दिला.

हिंदूंच्या निवेदनातील मागण्या !

१. ७०-८० दंगेखोर मुसलमानांना त्वरित अटक करण्यात यावी.

२. दंगलीमागील खरा हेतू शोधावा

३. दंगलीमागील मुख्य सूत्रधाराला अटक करावी.

४. ‘अशा घटनेनंतर पोलीस प्रशासनाला सहकार्य करणार्‍या आणि कायदा हातात न घेणार्‍या हिंदु तरुणांना का गोवण्यात येते ?’, याचा जाब विचारण्यात यावा.

हिंदुद्वेषी पोलीस निरीक्षक हिरे यांची वादग्रस्त कारर्कीद !

जळगावचे पोलीस निरीक्षक हिरे यांची कारकीर्द वादग्रस्त आहे. ८ मासांपूर्वी एका ६७ वर्षीय धर्मांधाने ५ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केला होता. त्या वेळी धर्मांधांवर गुन्हा नोंद करण्यामध्ये हिरे यांनी वेळकाढूपणा केला होता. धर्मांधांकडून वारंवार हिंदूंना त्रास देण्याचे प्रकार होत असतांनाही पोलीस निरीक्षक हिरे यांच्याकडून धर्मांधांच्या विरोधात आलेल्या तक्रारींची त्वरित नोंद घेतली जात नाही. त्यामुळे हिंदूंमध्ये त्यांच्याविषयी अप्रसन्नता आहे.

हिंदूंनी त्यांची वस्ती सोडून जाण्यासाठी ४ वर्षांपासून धर्मांधांकडून हिंदूंना त्रास देण्याच्या घटना !

गेल्या ४ वर्षांपासून जळगाव येथील धर्मांधांकडून सम्राट कॉलनी येथील हिंदूंना त्रास देण्याच्या वारंवार घटना घडत आहेत. मासूमवाडी येथील रस्त्यावरूनच सम्राट कॉलनी येथे जावे लागते. त्या वेळी हिंदु महिलांची छेड काढणे, शेरेबाजी करणे, हिंदू जात असतांना त्यांच्यावर अंडी किंवा दगडफेक करून पळून जाणे, गांजा ओढणे, मोटारसायकलीवरून तिघेजण आरडाओरड करत जाणे, वेगवेगळे आवाज काढणे, असे अनेक प्रकार धर्मांध करून हिंदूंना त्रास देत आहेत; मात्र याची तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून या धर्मांधांवर कोणतीच कारवाई होत नाही. उलट हिंदूंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो. हिंदूंनी सम्राट कॉलनी येथील वस्ती सोडून जाण्यासाठी धर्मांधांकडून हिंदूंना त्रास देण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदुत्वनिष्ठ सरकारच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

  • धर्मांधांवर गुन्हे नोंदवण्यास टाळणारे पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?