नगर येथे १५ दिवसांत ८ अल्पवयीन मुली बेपत्ता : २ धर्मांधांना अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

राहुरी (जिल्हा नगर) – येथे मागील आठवड्यात ६ अल्पवयीन मुली घरातून गायब झाल्या. पुन्हा मागील २ दिवसांत २ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. मागील १५ दिवसांत एकूण ८ प्रकरणे पुढे आल्याने पालकांची चिंता वाढली आहे. मागील आठवड्यात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा फारूक शेख याला मुलीसह कह्यात घेण्यात आले. दुसर्‍या घटनेत सादिक शेख याने हळद लागलेली नवरीच लग्नाच्या दिवशी पहाटे मंगल कार्यालयातून पळवून नेली होती. त्यालाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे. ७ मे या दिवशी १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली. दुसर्‍या घटनेत ८ मे या दिवशी १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. दोन्ही घटनेत पालकांच्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

धर्मांधांकडून हिंदु मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना वाढलेल्या असतांना पोलीस आणि प्रशासन झोपा काढत आहे का ? नगरचा केरळ करायचा आहे का ?