सनातनच्या आश्रमातील शिवणकामाच्या सेवेसाठी त्याचा अनुभव किंवा कौशल्य असणार्‍यांची आवश्यकता !

साधकांना सूचना आणि सनातनचे वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

‘सनातनचे विविध ठिकाणचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे दर्शनीय भागांत, तसेच अनेक निवासी खोल्यांमध्ये चांगल्या पायपुसण्यांची आवश्यकता आहे. या ठिकाणी दैनंदिन वापरासाठी वर्षभरात ३००० एवढ्या मोठ्या संख्येने पायपुसणी लागतात. ही पायपुसणी शिवण्याची सेवा करायची आहे.

या सेवेच्या अंतर्गत ‘पायपुसण्यांसाठी लागणार्‍या कापडांना इस्त्री करणे, कापडाचे ‘कटिंग’ करणे आणि पायपुसणी शिवणे’, अशा प्रकारच्या सेवा असतात. साधक, वाचक, हितचिंतक किंवा धर्मप्रेमी यांच्यापैकी ज्यांना शिवणकामाचा अनुभव आहे किंवा ज्यांचा हा व्यवसाय आहे, अशा सर्वांसाठी ही सेवेची सुवर्णसंधी आहे.

जे किमान ८ – १० किंवा त्यापेक्षा अधिक दिवस गोव्यातील रामनाथी आश्रमात येऊन ‘पायपुसणी शिवणे’ ही सेवा करू शकतात, अशा इच्छुकांनी शेवटी दिलेल्या पत्त्यावर संपर्क करावा. जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी ‘सेवा’ म्हणून घरी राहून या सेवेमध्ये सहभागी होऊ शकतात, त्यांनी तसेही कळवावे.

शिवणसेवा करण्यास इच्छुक असलेल्यांनी स्थानिक साधकांच्या माध्यमातून याविषयी जिल्हासेवकांना कळवावे. जिल्हासेवकांनी खालील सारणीनुसार माहिती पाठवावी.

जिल्हासेवकांनी साधक, वाचक, हितचिंतक किंवा धर्मप्रेमी यांची माहिती खालील सारणीनुसार पाठवावी !

नाव आणि संपर्क क्रमांक

सौ. भाग्यश्री सावंत (७०५८८८५६१०)

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा – ४०३४०१.’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (२२.४.२०२३)