पुंछ येथील आतंकवादी आक्रमणात सैनिक वीरगतीला प्राप्त झाल्याने स्थानिक मुसलमानांनी साजरी केली नाही ईद !

आतंकवाद्यांनी केलेल्या या ग्रेनेड आक्रमणामध्ये ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले होते !

पुंछ (जम्मू-काश्मीर) – येथे आतंकवाद्यांनी सैन्याच्या ट्रकवर केलेल्या ग्रेनेड आक्रमणामध्ये ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झाल्यामुळे स्थानिक मुसलमानांनी ईद साजरी केली नाही. हा ट्रक मुसलमानांच्या इफ्तार मेजवानीचे साहित्य नेत असतांना ही घटना घडली होती. राष्ट्रीय रायफल्सच्या पथकाने ही मेजवानी आयोजित केली होती. यात ४ सहस्रावधी लोक सहभागी होणार होते.

इफ्तारच्या मेजवानीचे साहित्य नेणारा ट्रक होता . . .

येथील संगिओत गावाचे सरपंच मुखतियाज खान यांनी सांगितले की, आमचे ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले आहते, अशा परिस्थितीत आम्ही इफ्तार कशी साजरी करू शकतो ? ही बातमी कळताच गावात हळहळ पसरली. आम्हालाही तेथे जायचे होते; पण पोलीस आणि सैन्य यांनी परिसराला वेढा घातला होता. आम्ही आता ईद साजरी करणार नाही, तर केवळ नमाजपठण करू.

संपादकीय भूमिका

देशातील किती मुसलमान असा विचार करतात ? काश्मीरच्या या मुसलमानांकडून अन्यत्रचे मुसलमान काही शिकतील का ?, असा प्रश्‍न कुणी उपस्थित केला, तर आश्‍चर्य वाटू नये !