इंदापूर तालुक्यात (पुणे) कत्तलीसाठी नेणार्‍या ३९ वासरांची सुटका; एका धर्मांधावर गुन्हा नोंद

इंदापूर तालुक्यात (पुणे) कत्तलीसाठी नेणार्‍या ३९ वासरांची सुटका

इंदापूर (जिल्हा पुणे) – येथील वडापुरी काटी मार्गावर कत्तल करण्यासाठी नेण्यात येणार्‍या ३९ लहान वासरांचा पिकअप टेंपो इंदापूर पोलिसांनी पकडला आहे. या प्रकरणी समिर रफिक बेपारी याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सलमान खान यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. (पोलिसांना न जुमानता इंदापूर तालुक्यात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणावर जनावरांची वाहतूक होत असल्याचे पुन्हा एकदा दिसून  आले आहे. गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी गोहत्‍या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून सर्व अवैध पशूवधगृहे बंद करावीत, असेच जनतेला वाटते ! – संपादक )

संपादकीय भूमिका

केवळ गोहत्याबंदीचे कायदे करून उपयोग नाही. कायद्याची प्रभावी कार्यवाही आणि धर्मांधांना कठोर शिक्षा केल्याविना गोहत्या थांबणार नाही !!