गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्‍या झालेल्‍या हानीचे पंचनामे न करणे, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार

‘महाराष्‍ट्रात ३ दिवस पडलेल्‍या अवकाळी पावसासह गारपिटीच्‍या घटनांत वाढ झाली आहे. राज्‍यात पिकांसह फळबागांची मोठी हानी झाली आहे. राज्‍यातील सरकार शेतकर्‍यांच्‍या प्रश्‍नावर असंवेदनशील आहे. अजूनही अनेक ठिकाणी हानीचे पंचनामे चालू करण्‍यात आलेले नाहीत. त्‍यामुळे राज्‍यातील शेतकरी हवालदिल झाला आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी  १७ मार्च २०२३ या दिवशी विधानसभेत केला.’ (१८.३.२०२३)