|
चंडीगड – ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख खलिस्तानवादी अमृतपाल सिंंह याच्याविषयी गुप्तचर यंत्रणेने खळबळजनक खुलासा केला आहे. अमृतपाल सिंह तरुणांना आत्मघातकी आक्रमणासाठी सिद्ध करत होता. यासाठी तो धार्मिक स्थळ आणि व्यसनमुक्ती केंद्र यांचा वापर करत होता.
अमृतपाल सिंह गेल्या वर्षी पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’च्या सांगण्यावरून दुबईहून भारतात आला. त्याला परदेशात रहाणार्या खलिस्तानवाद्यांचेही समर्थन होते, असा दावा गुप्तचर यंत्रणेने केला आहे. येथे आल्यावर तो तरुणांना ‘मानवी बाँब’ बनवण्यासाठीच्या कामात गुंतला होता. तो तरुणांचे बुद्धीभेद करत होता. अमृतपाल ‘आय.एस्.आय.’च्या साहाय्याने ‘आनंदपूर खालसा दल’ सिद्ध करत होता. ठार झालेला आतंकवादी दिलावर सिंह याच्या विचारांप्रमाणे वाटचाल करणाण्यासाठी तो तरुणांना भडकावत होता. दिलावर सिंह याने ‘मानवी बाँब’ म्हणून काम केले होते.
मानव बम तैयार कर था खालिस्तान समर्थक अमृतपाल सिंह, खुफिया दस्तावेज में हुआ खुलासा#AmritpalSingh #khalistan https://t.co/1f5Ma6LT4D
— Zee News (@ZeeNews) March 19, 2023
अमृतपाल सिंह धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवून पंजाबमधील वातावरण बिघडवत होता. त्याला विदेशातून निधी प्राप्त झाल्याचा संशय आहे, असे गुप्तचर अहवालात म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाअसे आहे, तर मग यापूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती पोलिसांना दिली होती का ? आणि पोलिसांनी त्यावर काय कारवाई केली ? अमृतपाल फरार होण्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या का नाही आवळल्या ? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजे ! |