जत (जिल्हा सांगली) येथील भाजप नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या !

जत (जिल्हा सांगली) – येथील भाजप नगरसेवक विजय ताड यांची भर दुपारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ते गाडीतून त्यांच्या मुलांना आणण्यासाठी सांगोला रस्त्यावरील शाळेजवळ पोचले असता अज्ञात आक्रमणकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर गोळीबार गेला. यात ते जागीच ठार झाले. हे आक्रमण कशामुळे झाले, ते समजलेले नाही. (दिवसाढवळ्या हत्या होणे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)