पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सादर !

पिंपरी – महापालिकेचा वर्ष २०२३ – २४ या आर्थिक वर्षाचा ५ सहस्र २९८ कोटी, तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह ७ सहस्र १२७ कोटी ८८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प महापालिकेचे आयुक्त, तसेच प्रशासन शेखर सिंह यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ, तसेच पाणीपट्टी वाढ केली नसल्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.