
कोल्हापूर – कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर राज्य पुरातत्व विभागाने वज्रलेप केला असून मूर्तीचे पाय, कंबर, हात आणि मुखमंडल या ठिकाणी पालट झाल्याचे दिसून येत आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये करण्यात आलेल्या संवर्धन प्रक्रियेमुळे देवीच्या मुखावरील पूर्ण भाव पालटले आहेत, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे मूर्तीची स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांनी १४ मार्चला सकाळी मूर्तीची पहाणी केली, तसेच जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली.
श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्ती संवर्धनाविषयी १५ मार्चला सुनावणी !
श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्ती संवर्धनाविषयी ८ सप्टेंबर २०२२ या दिवशी सहदिवाणी न्यायालयात दावा प्रविष्ट केला. मूर्ती संवर्धनाचे काम घाईगडबडीने करण्यात आले आहे. यामुळे मूर्तीची हानी झाली आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांकडे सक्षम, प्रशिक्षित कर्मचारी नाहीत. संवर्धनाचे काम केलेले लोक अपात्र आहेत. त्यामुळे या प्रकरणी केलेल्या संवर्धनाविषयी अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी १५ मार्चला होणार आहे.
मूर्तीच्या संदर्भातील विभागाने केलेले काम योग्य आहे. देवीच्या मूर्तीची स्थिती काळजी करण्यासारखी नाही, असेही विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले आहे. याविषयी विभाग सविस्तर अहवाल देईल. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी पत्रकारांना दिली.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.