‘हितचिंतक आणि अर्पणदाते यांनी साधना करून आध्यात्मिक प्रगती करावी’, या शुद्ध हेतूने धर्मकार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘हितचिंतक आणि अर्पणदाते यांनी सनातन संस्थेला धन अर्पण करण्याच्या समवेत साधना करून स्वतःची आध्यात्मिक प्रगती साध्य करावी’, या शुद्ध हेतूने धर्मकार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एकदा एका साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारले, ‘‘सनातन संस्थेचे कार्य वाढत आहे. त्यामुळे आपले नवीन आश्रम आणखी सिद्ध व्हायला हवेत. माझ्या ओळखीच्या काही धनाढ्य व्यक्ती आहेत. त्यांना सनातनचे कार्य सांगून मी आश्रम पहाण्यासाठी बोलवू का ? त्यातून आश्रमनिर्मितीच्या कार्याला धन प्राप्त होईल.’’ त्यावर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘आपल्याला केवळ नवीन आश्रमांच्या इमारती बांधायच्या नाहीत, तर सनातनचे हितचिंतक आणि अर्पणदाते यांचीही साधना होऊन आध्यात्मिक प्रगती व्हायला हवी. त्यासाठी त्यांना आश्रम पहाण्यासाठी घेऊन ये.’’

वरील प्रसंगातून शिकायला मिळालेली सूत्रे

१. सनातन संस्थेचा केंद्रबिंदू हा ‘प्रत्येकाची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, हा आहे. या तत्त्वाला अनुसरून परात्पर गुरु डॉक्टर नेहमी वागत असतात. त्याचे वरील एक उदाहरण आहे.

२. समाजातील काही संप्रदायांचा कल ‘साधना करणे किंवा आध्यात्मिक प्रगती साध्य करणे’, हा नसून ‘अधिकाधिक पैसे कमवणे’, हा आहे. परात्पर गुरु डॉक्टर निःस्वार्थ हेतूने आणि निरपेक्ष प्रेमाने समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहेत. असे गुरु कलियुगात मिळणे दुर्लभ आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टर आम्हाला गुरुरूपात लाभले’, याविषयी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०२२)