भारत हाच जगाचा खरा नेता ! – तालिबान

अफगाणिस्तानला साहाय्य करणार्‍या भारतावर तालिबानकडून स्तुतीसुमने !

तालिबान प्रवक्ते सुहेल शाहीन

काबुल (अफगाणिस्तान) – भारत हाच जगाचा खरा नेता आहे,  असे उद्गार तालिबान प्रवक्ते सुहेल शाहीन याने काढले. भूकेलेल्या अफगाणिस्तानातील लोकांसाठी २० सहस्र मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला मोफत पाठवण्याची घोषणा भारताने केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तो बोलत होता. शाहीन म्हणाला की, भारताच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या साहाय्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक बळकट होतील.

संपादकीय भूमिका 

भारताने जरी मानवतेच्या दृष्टीकोनातून अफगाणिस्तानला साहाय्य केले असले, तरी ‘इस्लामी शासकांना अशा साहाय्याची जराही किंमत नसते आणि असे साहाय्य करणार्‍यांवर ते प्रसंगी आक्रमण करायलाही पुढे-मागे पहात नाहीत’, हेच इतिहास सांगतो, हेही सरकारने लक्षात घ्यावे !