राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात हिरकणी कक्ष निर्माण करण्यात येईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिलांसाठी हिरकणी कक्ष निर्माण करण्यात येईल. मंत्रालयामध्येही महिलांसाठी हिरकणी कक्ष निर्माण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ मार्च या दिवशी महिला दिनाच्या दिवशी विधानसभेत केली.

प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी स्वतंत्रपणे जनता दरबार घेणार ! – मंगलप्रभात लोढा, महिला आणि बाल कल्याणमंत्री

प्रत्येक जिल्ह्यात पहिलांच्या प्रश्नांसाठी आठवड्यातून एकदा जनता दरबार घेण्यात येईल. या जनता दरबारामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आयुक्त आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित असतील. प्रत्येक जनता दरबारामध्ये महिलांच्या ५० तक्रारी घेण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी स्वतंत्र बाजार गट निर्माण करण्यात येतील. यासाठी महिला बचतगटांना त्यांच्या उत्पादनासाठी जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल. येत्या १ वर्षात प्रत्येक जिल्ह्यात बाजार गटासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. महामार्गावर प्रत्येक ५० किलोमीटर अंतरामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह निर्माण करण्यात येईल. यापुढे जे नवीन रस्ते होतील. त्या सर्व रस्त्यांवर अशा प्रकारे सुविधा निर्माण करण्यात येईल. जिल्हा नियोजनमधून महिलांसाठी ३ टक्के निधीची तरतूद करण्यात येईल, अशा विविध घोषणा महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिलादिनाच्या दिवशी केल्या.

महिलांसाठी स्वतंत्रपणे जनता दरबार घेणार ! – मंगलप्रभात लोढा