औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ करण्यास केंद्राची अनुमती !

मुंबई – औरंगाबाद या शहाराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याच्या राज्याने घेतलेल्या निर्णयावर केंद्राकडून संमती मिळाली आहे. उस्मानाबाद या शहराचे नामकरण धाराशिव करण्यालाही संमती देण्यात आली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वर्ष १९८७ मध्ये औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करत ते रूढ केले होते. शिवसेना आणि भाजप युती सरकारने त्याला मान्यता दिली होती. या प्रकरणी अनेक याचिका प्रविष्ट झाल्या होत्या.