देहली येथे मंदिराच्या शेजारी गोहत्या केल्याच्या प्रकरणी मुसलमान तरुणाला अटक

अटक करण्यात आलेला आरोपी

नवी देहली – देहली पोलिसांनी गोहत्या केल्याच्या प्रकरणी आफताब नावाच्या २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तसेत घटनास्थळावरून गोमांस जप्त केले. आफताब आणि त्याचे साथीदार अक्रम, सलीम, मारुफ, अलतामस यांनी एका मंदिराजवळ असणार्‍या मोकळ्या जागेवर गोहत्या केली होती. पोलीस आफताबच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. रोहिणी भागातील गोहत्येमध्येही याच आरोपींचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

संपादकीय भूमिका

दिवसाढवळ्या गोहत्या होत असतांना त्याची माहिती नसणारे पोलीस काय कामाचे ?