जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ७ मिनिटे जुनेच अर्थसंकल्पीय भाषण वाचून दाखवले. विरोधकांच्या हे लक्षात आले आणि ते सभागृहात हसू लागले. चूक लक्षात आल्यावर गेहलोत यांना थांबवण्यात आले. चूक लक्षात येताच गेहलोत यांनी सभागृहाची क्षमा मागितली. जुने भाषण वाचून दाखवल्यामुळे विरोधकांनी गोंधळ घातला.
“मुझे खेद है…” : पुराना बजट पढ़ने पर राजस्थान के CM #AshokGehlot ने मांगी माफी https://t.co/shNAwyRMdN
— NDTV India (@ndtvindia) February 10, 2023
यामुळे विधानसभेचे कामकाज ३० मिनिटे स्थगित करण्यात आले. विधानसभेत जुने अर्थसंकल्पीय भाषण वाचून दाखवण्यात आल्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव उषा शर्मा यांना बोलावून अधिकार्यांच्या निष्काळजीपणाविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी ज्या बॅगेत भाषणाची कागदपत्रे ठेवली जातात, त्यात जुने भाषण ठेवण्यात आल्याने तो अधिकार्यांचा निष्काळजीपणा असल्याचे सांगितले जात आहे.
(अधिकार्यांचा निष्काळजीपणा असला, तरी मुख्यमंत्र्यांचीही सतर्कता अल्प पडली, हेही तितकेच खरे ! – संपादक) या घटनेनंतर काही अधिकार्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकाअशा निष्काळजीपणाला काय म्हणायचे ? असे काँग्रेसवाले कसा कारभार हाकत असतील, याचा विचारही न केलेला बरा ! |