सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे विश्वविद्यालयाच्या बसमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

२ मुसलमान विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंद !

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथील ग्लोकल विश्वविद्यालयाच्या बसमध्ये विद्यार्थ्यांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. पोलिसांनी या घोषणांच्या प्रकरणी शोभन आणि अहमद  शबाब मलिक या २ विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी विश्वविद्यालयाने मौन बाळगले आहे.

संपादकीय भूमिका

अशांना आता दिवाळखोर पाकिस्तानमध्ये पाठवणे हीच कठोर शिक्षा ठरील !