बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८.१.२०२३ या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे सूक्ष्म परीक्षण !

‘गेल्या काही वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भारतातील विविध राज्यांमध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन केले जाते. देवाच्या कृपेने ८.१.२०२३ या दिवशी बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या अशाच प्रकारच्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित रहाण्याची मला संधी मिळाली. तेव्हा देवाच्या कृपेने सभेचे माझ्या लक्षात आलेले आध्यात्मिक महत्त्व देत आहे. २९ जानेवारी २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेतील विविध घटकांचे आध्यात्मिक महत्त्व आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभेतील घटनाक्रमांचे अन् वैशिष्ट्यपूर्ण कृतींचे आध्यात्मिक महत्त्व (टक्के) आणि आध्यात्मिक लाभाचे स्वरूप’, ही सूत्रे वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

कु. मधुरा भोसले

(भाग २)

भाग १ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/649606.html

बांदा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला असलेली उपस्थिती

३. हिंदु राष्ट्र-जागृती सभांतून प्रक्षेपित होणारे विविध प्रकारचे घटक, त्यांचे प्रमाण आणि महत्त्व

धर्मतत्त्वच परमतत्त्व असल्यामुळे हिंदु राष्ट्र-जागृती सभेतून धर्मतत्त्वातून शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या ५ मुख्य तत्त्वांचे प्रक्षेपण होऊन या पंचतत्त्वांची अनुभूती सभेला उपस्थित असणार्‍या हिंदूंना येते.

४. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी घेतलेल्या सभांतील विविध स्तरांतून प्रक्षेपित होणारे पंचतत्त्वांचे प्रमाण

५. सभेला उपस्थितअसणार्‍या हिंदूंना स्थळ आणिकाळ यांचा विसर पडणे 

स्थुलातून हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे ठिकाण एक मैदानापुरते मर्यादित दिसत असले, तरी सूक्ष्मातून त्याची व्याप्ती पुष्कळ होती. त्यामुळे सभेला उपस्थित असणार्‍या हिंदूंना स्थळ आणि काळ यांचाविसर पडतो.

(क्रमश: उद्याच्या दैनिकात)

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.