श्रीरामचरितमानसवर बंदी घालण्याची मागणी करणारे स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर गुन्हा नोंद

मौर्य यांना लक्ष्मणपुरी येथील प्रसिद्ध लेटे हनुमान मंदिरात आता प्रवेशबंदी

डावीकडे स्वामी प्रसाद मौर्य

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – श्रीरामचरितमानसवर बंदी घालण्याची मागणी करणारे समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांना आता येथील प्रसिद्ध लेटे हनुमान मंदिरामध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या संदर्भातील एक भित्तीपत्रक लावण्यात आले असून त्यांना ‘अधर्मी’ म्हटले गेले आहे. ही बंदी मंदिर प्रशासनाकडून घालण्यात आल्याचेही या पत्रकात म्हटले आहे. तसेच शहरातील हजरतगंज पोलीस ठाण्यात मौर्य यांच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.


१. मंदिर प्रशासनाच्या एका सदस्याने सांगितले की, आम्ही अशा प्रकारच्या अधर्मी मानसिकतेच्या लोकांना मंदिर परिसरात येऊ देणार नाही.

२. अन्य एका सदस्याने सांगितले की, मौर्य यांना धर्माचे कोणतेही ज्ञान नाही. भविष्यात मंदिर प्रशासन सनातन धर्माच्या विरोधात कुणी विधान केले, तर त्याला मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी घालेल.

संपादकीय भूमिका 

हिंदुद्वेष्टे मौर्य याच्यावर कारवाई होण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने लढा देऊन प्रशासनावर दबाव आणणे आवश्यक !