सोलापूर, २४ जानेवारी (वार्ता.) – वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील सात रस्ता परिसरातील महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या वेळी सोलापूर महापालिका परिवहन समितीचे सभापती जय अण्णा साळुंखे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुरुषोत्तम कारकल, बजरंग दलचे अंबादास गोरंटला, तसेच नागेश बंडी, प्रमोद येलगंटी, गोरक्षक प्रतीक्षित परदेशी, अमरनाथ परदेशी, प्रवीण परदेशी, सतीश सिरसिल्ला, विजय यादव, शुभम साठे, मल्लिनाथ पाटील, राजू मन्सावाले, अथर्व परदेशी, संतोष परदेशी, देविदास सतारवाले, किशोर बिरबानवाले, विशाल पवार, अनिकेत चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे विनोद रसाळ, विपुल भोपळे, गोपी व्हनमारे आदी उपस्थित होते.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी महाराणा प्रताप यांचा गौरव करतांना उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना जय भवानी प्रशालेच्या मैदानावर १५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रण दिले, तसेच सभा यशस्वी होण्यासाठी यथाशक्ती योगदान करण्याचे आवाहन केले.
महाराणा प्रताप यांच्या स्मारकाकडे होत असलेले दुर्लक्ष निंदनीय ! – शीतल परदेशी
या वेळी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलचे सहविभाग प्रमुख श्री. शीतल परदेशी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजही महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाचा आदर्श मावळ्यांसमोर ठेवायचे, अशा महाराणा प्रताप यांच्या स्मारकाकडे होत असलेले दुर्लक्ष निंदनीय आहे. प्रशासनाने यावर त्वरित उपाय काढावा.’’