बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथील दर्ग्याच्या शेतात सापडली हनुमानाची मूर्ती !

(दर्गा म्हणजे मुसलमानाची कबर)

भोपाळ – राज्यातील बुरहानपूर येथील दर्गाह-ए-हकीमी आणि श्री इच्छेश्‍वर मंदिर ट्रस्ट यांच्यात भूमीवरील अतिक्रमणावरून वाद चालू आहे. याच पार्श्‍वभूमीवर हिंदु संघटना आणि दर्गाह-ए-हकीमी समोरासमोर आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. ३ जानेवारी २०२३  या दिवशी बुरहानपूरमधील लोधीपुरा येथील दर्गाह-ए-हकीमीच्या मालकीच्या शेतात हनुमानाची मूर्ती सापडल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. हिंदू संघटना आणि स्थानिक लोक यांनी, ‘या ठिकाणी पूर्वी मंदिर होते आणि त्याच्या संरक्षणाचे आश्‍वासन देऊन दर्ग्यासोबत भूमीचा व्यवहार करण्यात आला होता; मात्र दर्ग्याच्या व्यवस्थापक मंडळाने येथील मंदिर उद्ध्वस्त केले, तसेच तेथे जाणारा मार्गही बंद केला’, असा आरोप केला. (मुसलमानांशी भूमीचा व्यवहार करून त्यांच्या आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवणे, हा आत्मघात आहे. हिंदूंच्या हे लक्षात येईल, तो सुदिन ! – संपादक)

अलीकडेच दर्गाह-ए-हकीमी आणि इच्छेश्‍वर मंदिर ट्रस्ट यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आमदार सुमित्रा कासदेकर यांच्यासह मंदिर ट्रस्टचे लोक शेताच्या जवळ पोचले. त्यांना शेतातील  झुडपांमध्ये हनुमानाची मूर्ती दृष्टीस पडली. हनुमान भक्तांनी शेताच्या द्वाराचे कुलूप तोडून श्री हनुमानाची प्राचीन मूर्ती बाहेर काढली. तेथे त्यांनी हनुमानाच्या मूर्तीची पूजा केली.

संपादकीय भूमिका 

भूमी जिहादची नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. हे रोखण्यासाठी आता लव्ह जिहादविरोधी कायद्याप्रमाणे भूमी जिहादविरोधी कायद्याची आवश्यकता आहे !