हडपसर (पुणे) येथे ४ गोवंशियांची कत्तलीपासून सुटका, मुसलमान टेंपोचालकावर गुन्‍हा नोंद !

हडपसर (जिल्‍हा पुणे) – सोलापूर रस्‍त्‍याने १ जानेवारी या दिवशी हडपसरच्‍या दिशेने जाताना एक टेंपो ज्‍यामध्‍ये १ काळ्‍या- पांढर्‍या रंगाची गाय, एक म्‍हैस आणि २ लाल रंगाची गिरी खोड दाटीवाटीने कत्तलीसाठी वाहतूक करतांना आढळून आले. ही गाडी या पूर्वीही लोणी काळभोर पोलीस ठाण्‍याच्‍या परिसरात गोवंशियांच्‍या कत्तलीसाठी वाहतूक करतांना पकडली होती आणि टेंपोचालकावर गुन्‍हा नोंद केला होता. पोलिसांच्‍या साहाय्‍याने हा टेंपो हडपसर पोलीस ठाणे येथे आणून टेंपोचालक आसिफ सय्‍यद याच्‍यावर गुन्‍हा नोंद करून गोवंश सुखरूप श्री द्वारकाधिश गोशाळेत सोडले आहेत. या वेळी हडपसर पोलिसांनी सहकार्य केले.

संपादकीय भूमिका 

गोवंशियांच्‍या कत्तलीमध्‍ये नेहमीच धर्मांधांचा सहभाग असणे संतापजनक आहे. गोहत्‍या करणार्‍यांना कठोर शिक्षा न केल्‍याचा हा परिणाम !