स्विडनमध्ये झालेल्या गोळीबारात एक जण ठार

स्टॉकहोम (स्विडन) – स्विडनमधील वलिंगबाय येथे १ जानेवारीच्या सायंकाळी गोळीबार झाला. गोळीबार करणार्‍यांनी त्यांचा तोंडवळा झाकला होता. या गोळीबारात ४ जण घायाळ झाले, त्यातील एकाचा उपचारांच्या वेळी मृत्यू झाला. या आक्रमणाच्या प्रकरणी अद्याप कुणालही अटक करण्यात आलेली नाही.

धर्मांधांकडून रॉकेट फटाक्यांद्वारे आक्रमण !

याच दिवशी स्केन येथे काही जणांकडून रॉकेट फटाके इमारत आणि वाहने यांवर सोडण्यात आले. यास एका व्यक्तीने विरोध केला असता त्याला मारहाण करण्यात आली. पोलीस आणि अग्नीशमन दल यांच्यावरही हे रॉकेट सोडण्यात आले. हे रॉकेट सोडणारे ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा देत होते, असे सांगण्यात आले.