स्वतःच्या मुलीचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्याचा जाब विचारल्यावर झालेल्या मारहाणीत मृत्यू

नदियाद (गुजरात) – येथील मेलजीभाई वाघेला या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाची एका कुटुंबाने हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे.
#BSF Soldier Beaten To Death In Gujarat’s Nadiad For Protesting Against Daughter’s Obscene Video#Gujarat #Nadiad #Death #Crime #Murder https://t.co/ukhvSKME1v
— India.com (@indiacom) December 26, 2022
वाघेला यांच्या मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ या कुटुंबातील एका १५ वर्षांच्या मुलाने सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला होता. याचा जाब विचारण्यासाठी वाघेला त्यांची पत्नी, २ मुले आणि पुतण्या यांच्या समवेत गेले होते. या वेळी मुलाच्या नातेवाइकांनी त्यांना शिवीगाळ केल्यावर वाद झाला आणि त्यातून वाघेला यांना मारहाण करण्यात आली. यात त्यांचा मृत्यू झाला. आरोपी मुलगा वाघेला यांच्या मुलीच्या वर्गात शिकत होता. या दोघांमध्ये प्रेम होते, अशी माहिती समोर आली आहे.
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk