समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या दहशतीमुळे इस्लाम स्वीकारल्याचा गंभीर आरोप

मुझफ्फरनगर – उत्तरप्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील मुझफ्फरनगर येथील १२ कुटुंबांतील ८० सदस्यांनी नुकताच इस्लामचा त्याग केला आणि हिंदु धर्मात ‘घरवापसी’ (पुनर्प्रवेश) केली. बघरा ब्लॉकमध्ये असलेल्या ‘योग साधना आश्रमा’चे महाराज यशवीरजी यांनी प्रत्येकाला गंगाजलाने शुद्ध केले आणि सर्वांच्या गळ्यात यज्ञोपवित घालून पवित्र केले. नंतर गायत्री मंत्राचे उच्चारण करून आणि यज्ञात आहुती देऊन सर्वांना इस्लाममधून हिंदु धर्मात पुनर्प्रवेश देण्यात आला. या लोकांनी समाजवादी पक्षाचे धर्मांध नेते आझम खानवर यांच्यावर आरोप करत म्हटले, ‘१२ वर्षांपूर्वी आझम खान यांनी आमचे बळजोरीने धर्मांतर केले होते. आमची भूमी आणि मालमत्ता आझम खान यांच्या गुंडांनी बळकावल्या आहेत.’
मुजफ्फरनगरः मुस्लिम धर्म अपनाने वाले 80 लोगों ने फिर अपनाया हिंदू धर्म, आजम खान पर लगाए गंभीर आरोप #Islam #Muzaffarnagar #Hinduism #AzamKhanhttps://t.co/T1ZNYnCIKK
— Samachar Today™ (@samachartodaytv) December 12, 2022
१. पूर्वी ‘हरजाना’ असलेल्या आणि आता ‘सविता’ बनलेल्या महिलेने सांगितले, ‘मी आझम खान यांच्या दबावामुळे मुसलमान झाले. आमची भूमी आणि मालमत्ता हिसकावून घेण्यात आली. आझम खान यांच्यामुळे लाखो लोक त्रस्त झाले आहेत. आता आम्ही आमच्या समाजामध्ये येऊन पुष्कळ आनंदी आहोत.’
२. या सर्व लोकांना हिंदु धर्मात परत आणणारे यशवीर महाराज म्हणाले, ‘‘रामपूरमधील धोबी समाजातील अनेक कुटुंबांतील ८० सदस्यांना हिंदु धर्मात परत आणण्यात आले. या सर्व लोकांना आझम खान यांनी लक्ष्य केले होते. त्यांना आमीष दाखवून आणि धमक्या देऊन इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. त्यांना शुद्ध करून पुन्हा हिंदु धर्मात आणण्यात आले आहे. आतापर्यंत अनुमाने ५३० लोकांना हिंदु धर्मात परत आणले आहे.’’
संपादकीय भूमिका
|
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन