देहलीत आफताब पूनावालाने ‘श्रद्धा’ वालकरची हत्या करत शरिराचे ३५ तुकडे केल्याची घटना नोव्हेंबर २०२२ मध्ये उघडकीस आली. श्रद्धाला श्रद्धांजली तर आहेच; पण तिच्या ‘विचारसरणी’ला तिलांजली कधी मिळेल ? ज्यांनी जन्म दिला, वाढवले त्या आई-बापांना झिडकारून मनमानी जगण्याच्या विचारसरणीला तिलांजली देण्याची वेळ जेव्हा येईल, तो हिंदु समाजासाठी भाग्याचा दिवस असेल. तो नजीकच्या भविष्यकाळात लवकर येईल, असे सध्या तरी वाटत नाही. ‘मागच्यास ठेच पुढचा शहाणा’, हा वाक्प्रचार या मुलींना लागू होतच नाही. ‘मुलींना’ हा शब्द वापरला म्हणून मुक्त पुरोगामी लगेच संतापाने हिरवे निळे होतील; पण ते अशा हत्याकांडात एक शब्द बोलत नाहीत. शक्य झालेच, तर उलट ‘हा वैयक्तिक गुन्हा आहे. त्याला धार्मिक रूप देऊ नका’, असे ज्ञान पाजळतात.
१. पुरोगामीवाल्यांकडून अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालणे
लव्ह जिहादने कित्येक वर्षांपूर्वीच ‘वैयक्तिक’ची सीमारेषा ओलांडली आहे. आम्ही हे न्यायालयात कित्येकदा बघितले आहे. या एका आफताब पूनावाला याला फाशी व्हावी, यासाठी लोक पोटतिडकीने मागणी करतील, ती रास्तही आहे; पण खरा प्रश्न ‘त्याच्या’पेक्षा ‘तिचा’ आहे. आपल्या समाजात मुलींना स्वातंत्र्य देण्याच्या अतिरेकी कल्पना रुजल्या आहेत. खरेतर राज्यघटनासुद्धा कुणालाही अनिर्बंध स्वातंत्र्य देत नाही; पण स्त्री हक्काच्या वहात्या पाण्यात नको ती मंडळीही हात धुऊन घेतात. यात सगळ्यात गलिच्छ, घाणेरडी जमात असेल, तर ती पुरोगाम्यांची ! यांचे लेख, त्यांच्या ‘पोस्टस’ (लिखाण) वाचणे, हासुद्धा एक गुन्हा ठरावा. हे नालायक अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली तरुण पिढीला केवळ देश, देव, धर्म, कुटुंब, परंपरा आणि नैतिकता, अशा प्रत्येक गोष्टीला विरोध शिकवतात. त्यातही ‘मुलगी’ हा विषय आला की, पुरोगाम्यांच्या लेखी आमच्या घरातल्या मुली वाया गेल्या, ‘ड्रग ॲडिक्ट’ (व्यसनाधीन) झाल्या, देहाचा व्यापार मांडून बसल्या, तिळतिळ झिजत मेल्या, तुकडे करून मारल्या तरीही घरच्यांनी त्यांना विरोध करता कामा नये. ‘इट ईज हर बॉडी (शरीर तिचे आहे), हर लाईफ (तिचे जीवन आहे)’ वगैरे. अरे, ही काय विकृती आहे ? डोळ्यादेखत बुडणारी मुलगी नुसती बघत रहायची ? वाचवायचे नाही का तिला ? का ? तर ती ‘स्वतंत्र’ मुलगी आहे म्हणून? या ‘इंटरफेथ’ (आंतरपंथीय) प्रेमप्रकरणांमध्ये मृत्यू झालेली व्यक्ती कायम हिंदु मुलगीच असते, हा अनुभव आहे, म्हणून मुलींविषयी बोलणे आवश्यक झाले आहे.
२. नवीन पिढीला पालटण्यासाठी धर्म शिकवणे आवश्यक !
नको त्या कल्पनांनी नासवलेली ही पिढी आता एका रात्रीत पालटणार नाही. सध्या घडणार्या अनेक भीषण घटनांनीसुद्धा ज्या मुलींना अक्कल येत नाही, त्यांना नुसत्या उपदेशाने काय जाणवणार आहे ? त्यासाठी लहानपणापासून त्यांना ‘ऐकणे’ या साध्या गोष्टीची सवय लावावी लागेल. त्यांना शिस्त लावा, नैतिकता आणि परंपरा शिकवा, शुभम् करोती म्हणू द्या, मंदिरात घेऊन जा, श्रद्धा शिकवा, धर्म शिकवा आणि महत्त्वाचे म्हणजे आधी या गोष्टींची टिंगल बंद करायला शिकवा. परधर्मद्वेष शिकवण्यापेक्षा स्वधर्माचा अभिमानच पुरेसा आहे.
३. हिंदु मुलामुलींना जमात-ए-पुरोगामींपासून लांब ठेवायला हवे
अतीशिक्षित हिंदू आपल्या मुलांना सगळ्यात आधी हिंदु धर्माची टिंगल करायला शिकवतो, मग जमात-ए-पुरोगामी हीच टिंगल अश्लील भाषेत करायला शिकवते. पुढे हेच बुद्धिवादी, पुरोगामी दीडशहाणे इस्लामविषयी बोलायची वेळ आली की, हातभर शेपूट घालतात. अशी अक्षरश: सहस्रो उदाहरणे आहेत. कारण एकच आहे, ‘हे नेभळट आणि पुळचट आहेत.’ ते मुसलमानांची एकजूट आणि धर्मनिष्ठा यांना प्रचंड टरकून असतात. त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे परिणाम काय होतील ? याची धास्ती या भेकडांना सतत असते. त्यामुळे ‘सहिष्णू’ आणि निरुपद्रवी हिंदू हे यांचे लाडके गिर्हाईक आहे. पालकहो, शहाणे असाल, तर आपल्या मुलींना या पुरोगामी जमातीपासून शक्य तेवढे लांब ठेवा. पुरोगामी म्हणजे शेरडीचे (शेळीचे) शेपूट आहे. लाजही झाकत नाही, माशाही हाकलत नाही ! नुसतेच वळवळत रहाते.
४. बुद्धीवाद्यांच्या निर्बुद्ध प्रश्नाकडे लक्ष न देता मुलांवर संस्कार करा !
‘फक्त मुलींनाच का ?’, या संभाव्य निर्बुद्ध प्रश्नाकडेही लक्ष देऊ नका. आज मुलींचा जीव धोक्यात आहे, मुलींचे ३५ तुकडे होत आहेत, म्हणून आजतरी मुलींना सांभाळा, रागवा, त्यांना कुटुंब, संस्कार, शिस्त आणि परंपरा यांची सवय होऊ द्या. त्या योगे पुढे-मागे रडण्या-भेकणार्या आई-बापाला झिडकारून ‘मेरा आफताब…लव्ह यू जानू’, असे म्हणत निघून जाण्याचा हा जीवघेणा बिनडोकपणा घरोघरी तरी होणार नाही, अशी आशा आहे.
– अधिवक्ता सुशील अत्रे, जळगाव (नोव्हेंबर २०२२)