आज हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

तळोदा (जिल्हा नंदुरबार) – शेकडो हिंदूंच्या उपस्थितीत १० डिसेंबर या दिवशी येथे वाहनफेरी काढण्यात आली. ११ डिसेंबर या दिवशी होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त नागरिकांना आवाहन करण्याच्या उद्देशाने फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रत्येक गल्लीतील प्रत्येक चौकात धर्मध्वजाचे पूजन करून आणि वाहन फेरीत सहभागी झालेल्या युवकांवर फुलांची उधळण करून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रारंभी धर्मध्वजाचे पूजन करून श्रीदत्त मंदिरापासून फेरीला आरंभ करण्यात आला. श्री. वसंत पाटील यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. माळी समाज मंगल कार्यालयाच्या ठिकाणी फेरीची सांगता झाली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल वानखेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. फेरीत २५० वाहनचालक सहभागी झाले होते.
११ डिसेंबर २०२२ या दिवशी माळी समाज मंगल कार्यालय, तळोदा येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !