
पुणे – येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र भोसरीजवळ मोशी येथे भारतातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन हे १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. यात शेतकर्यांचा मेळा बघायला मिळणार आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याने शेतकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. १५ एकर परिसरात हे प्रदर्शन असून यात ५०० हून अधिक आस्थापने, संशोधन संस्था आणि नवीन उद्योजक हे शेतीतील नवीन तंत्रज्ञान अन् उत्पादने सादर करणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवे विचार शेतकर्यांपर्यंत पोचवणे, हा किसान प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.
प्रदर्शनात ५ दिवसांमध्ये देशभरातून दीड लाखांहून अधिक शेतकरी भेट देतील, असा अंदाज आहे. किसान प्रदर्शनाला कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य आणि शेती क्षेत्रातील मान्यवर संस्था यांचा सहभाग अन् सहकार्य लाभणार आहे. पाण्याचे नियोजन आणि सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार्या ८० हून अधिक आस्थापनांचा सहभाग, हे कृषी प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असेल.
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !